पोलीस भरती गाईड: महाराष्ट्र पोलिसांत २०२१-२२ मध्ये होणाऱ्या शिपाई पदाच्या भर्ती साठीचे निःशुल्क ऑनलाईन गाईड


Sanjay Barve, IPS (Retd.)
Former CP,  Mumbai

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठीच्या प्रशिक्षणार्थींचे या संकेतस्थळावर स्वागत आहे.


या website वरील प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य आहे.


महाराष्ट्र पोलिसांमध्ये  या वर्षी मोठी भरती होणार आहे. २०१९ मध्ये भरती झाली नाही. २०२० मध्ये कोरोनामुळे भरतीची प्रकिया घेणे शक्य झाले नव्हते. दोन लाखाहून अधिक संख्याबळ असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात दरवर्षी साडेतीन टक्के या दराने झीज (attrition) होते. २०१९ तसेच २०२० चा रिक्त जागांचा बॅकलॉग आणि आणि २०२१ मध्ये निर्माण होणाऱ्या रिक्त जागा लक्षात घेता आजमितीस १२,००० पेक्षा जास्त रिक्त पदे उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या माननीय गृहमंत्र्यांनी देखील डिसेंबर, २०२१ पूर्वी ५२०० पदे आणि त्यानंतर ७००० पदे भरण्याबाबत वक्तव्य केले आहे. राज्यातील तरुणांसाठी ही एक फार मोठी संधी चालून आलेली आहे.


महाराष्ट्र पोलीस दलातील ३३ वर्षांच्या सेवेदरम्यान मी नाशिक, नागपूर, गडचिरोली, वर्धा, मुंबई, आणि SRPF या पोलीस घटाकांत ५,००० पेक्षा अधिक पोलिसांची भरती केली आणि संचालक, MPA-नाशिक म्हणून काम करीत असताना ६,००० पेक्षा अधिक पोलीस उप निरीक्षकांना प्रशिक्षित केले. त्यामुळे भरती साठी नक्की कशी तयारी करावयाची आणि उमेदवार नेमक्या काय चुका करतात हे मला चांगलेच माहीत आहे. या अनुभवाचा फायदा तुम्हा सर्वांना व्हावा याकरिता हे विनामूल्य online प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे.


पोलीस भरतीच्या जाहिराती येताच महाराष्ट्रात भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रांचे पेव फुटते. दुर्गम भागात राहणाऱ्या आणि गरीब उमेदवारांना मात्र कोणत्याच प्रशिक्षणाचा लाभ घेता येत नाही. शिवाय हे प्रशिक्षण म्हणजे काही rocket-science नव्हे. मैदानी चाचण्यांसाठीच्या काही practical tips, नियमित व्यायाम, चांगला खुराक, शारीरिक चाचण्यांच्या पूर्व तयारीसाठीची नियमित प्रॅक्टिस, आणि MCQ प्रकारच्या लेखी परीक्षेची कसून तयारी ... ...एवढ्या गोष्टी यशस्वी होण्यास पुरेश्या आहेत. या online ट्रेनिंगच्या माध्यमातून हि सर्व तयारी करून घेतली जाईल. यशाचा फॉर्म्युला हाच कि .. .. ..मार्गदर्शन आमचे आणि मेहनत तुमची !


महाराष्ट्र पोलीस दलातील मोठी भरती यावर्षी आणि पुढल्या वर्षी अश्या दोन टप्प्यांमध्ये होईल हे आता स्पष्ट झाले आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये ५० गुणांच्या ३ मैदानी चाचण्या आणि १०० गुणांची MCQ पद्धतीची लेखी परीक्षा असेल. २०२२ मध्ये भरतीच्या format मध्ये बदलही होऊ शकतो. मात्र भरती कशीही झाली तरीही पूर्व-तयारी मध्ये कोणताही बदल होत नाही. चला तर, तयारीला लागूया.


लक्षात ठेवा. महाराष्ट्रात पोलीस भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली जाते. सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असते. जुगाड करून, अथवा शिफारशीने वा वशिल्याने कोणाचीही भरती होत नाही. म्हणूनच असला आडमार्ग अवलंबू नका. आडमार्गाने कोणताच फायदा होणार नाही. झाले तर नुकसान मात्र होईल. कठोर परिश्रमास कोणताही पर्याय नाही, कारण स्पर्धा खूपच तगडी असेल. क्लासेस वर खूप पैसे खर्च करण्यापेक्षा संतुलित खुराकावर आणि चांगल्या रनिंग शूज वर पैसे खर्च करा आणि या website वरील online मार्गदर्शनानुसार जय्यत तयारी करा.


परीक्षेच्या तयारीसाठी तुमच्या हातातील smartphone चा आणि internet वरील ज्ञानाच्या सागराचा कसा वापर करायचा हे MCQ Tests - लेखी चाचण्या या पेज वरून तुम्हाला कळून येईल.


मैदानी चाचण्यांसाठी Warm-up & stretches आणि Outdoor Tests या पृष्ठांवर दर्शविल्यानुसार मैदानी चाचण्यांची तयारी करावी.

  • मात्र सर्वप्रथम पोलीस भरतीच्या तयारीसाठी  १० मित्रांचा ग्रुप तयार करा.  कोणत्याही Group Chat App वर  [Training] असा ग्रुप बनवा.  अश्या ग्रुप्स मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावीपणे होते. ग्रुप मधील सर्व जण उमेदवार असावेत आणि जवळपासच्या मोहोल्ल्यात राहणारे असावेत.
  • सहमतीने एक Group Leader निवडा. लीडरने  ग्रुप मधील ९ सदस्यांकडून Join Course  या tab मध्ये दिलेला फॉर्म भरून घ्यावा.   
  • MCQ बाबतच्या YouTube विडिओमध्ये दिलेले गृहपाठ ग्रुप लीडरने आपल्या ग्रुप मधील सहकाऱ्यांमध्ये वाटप करावे आणि प्रत्येकाकडून त्याचे वाट्याचा अभ्यास करून घ्यावा. 


या वेबसाईट सोबत तुम्हाला Sanjay Barve E Academy या YouTube चॅनेल ला subscribe करावयाचे आहे. या YouTube चॅनेल वर MCQ tests चे विवेचन आणि उकल तुम्हाला मिळेल. YouTube चॅनेलवरील videos आणि या संकेतस्थळावरील वरील माहितीच्या माध्यमातून आपली पूर्व तयारी करून घेतली जाईल.

Subscribe to our YouTube channel :
https://www.youtube.com/channel/UCg_dD-EUZ3kfbVdKobuci-A


बेस्ट ऑफ लक👮👍

संजय बर्वे  (भा.पो.से.- से.नि.)

माजी पोलीस आयुक्त, मुंबई 

*************************************************************************************
Disclaimer:- The training imparted through this website and YouTube videos is intended to help candidates/aspirants to prepare for the police-recruitment. The success depends on the practice, hard work and study inputs by the candidates and this website does not guarantee any placement or job to any candidate/aspirant. The course on this website is completely free and we do not authorise anyone to charge/collect any fee for the content or for providing solutions to MCQ tests contained therein.


Copyright Notice

© 2021 Sanjay Barve E Academy
Except as otherwise noted, the content of this page is licensed under CC BY-NC-SA 4.0 license.
Suitable attribution along with the link to this website is required for use/reproduction of its content. If any additions and/or modifications are made, the same shall also be subject to, and governed by CC BY-NC-SA 4.0.